लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कोरोना संकटकाळात संचारबंदीमुळे अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी आली असल्याने अशा कलाकारांना अर्थसहाय्य करण्यासाठी एकल कलाकार अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभासाठी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
सांस्कृतिक व कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी ही राज्य शासनने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एकल कलाकार एकरकमी अर्थ सहाय्य योजना सुरू केली असुन याकरिता तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समितीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य योजनेचे अर्ज प्राप्त करावे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून या समितीचे तालुका पातळीवरील अध्यक्ष तहसीलदार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, समितीचे सचिव सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे छाननी समितीकडे द्यावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोना संकट काळात आर्थीक संकटात ओढवलेल्या कलाकारांनी या योजनेचा अर्थसहाय्य लाभ मिळवण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन एकल कलाकार निवड समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.