लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पस्तीस वर्षापूर्वीच जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा रविवारी १६ जानेवारी रोजी 11 वाजता घडवून आणला मेळाव्याला ३५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
आदर्श विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी हे शासकीय निमशासकीय, व्यवसायिक, शेतकरी या दर्जातील होते. राज्यभरात विखुरलेले सर्व विद्यार्थी एकत्र आणण्याचे काम तुकाराम सोनवणे व डॉ. शोभना तळेले यांनी केले. या दुग्धशर्करा कार्यक्रमात तिन दशकानंतर आपल्या विद्यार्थ्यांना विद्यालयात पुनश्च पाहुन अक्षरशः सेवानिवृत्त शिक्षकांचे डोळे पाणावले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील तर मुख्याध्यापक एस.डी.चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक एल.एम. चोपडे उपस्थित होते. प्रास्ताविक सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले.
कार्यक्रमासाठी गोकुळ पाटील, प्रवीण जावळे, पी बी पाटील, जे.डी. चौधरी, नंदकिशोर पाटील, सुपडु पाटील ,तुकाराम सोनवणे, खतीब तडवी, महेमुद तडवी, महेबुब तडवी, उल्हास बर्डे ,धनराज पाटील, भगवान तळेले, सुनंदा नारायण पाटील, मिराबाई महेश्री,आशा जावळे, कोकिळा कुलकर्णी, संध्या महाजन, विजया पाटील, ललिता पाटील, सीताबाई पाटील, राजू महाजन, भरत महाजन, भटू पाटील आदी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी या प्रसंगी उपस्थितीत होते.