Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : ३०० शिवभक्त अडकले, पोलीस यंत्रणेने सुखरूप आणले बाहेर !
    राज्य

    मोठी बातमी : ३०० शिवभक्त अडकले, पोलीस यंत्रणेने सुखरूप आणले बाहेर !

    editor deskBy editor deskJuly 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी गेले आहे त्यातील रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसाने शेकडो पर्यटकांना तातडीने काल गडावरून खाली यावे लागले. शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशारा संदर्भात येत्या 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग तसेच रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने व रायगड प्राधिकरणचे प्रमुख यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

    दरम्यान आज (सोमवार) सकाळी पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी गडावर गेलेल्या 300 शिवभक्त पर्यटकांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात आल्याची माहिती रोपवे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर तसेच नाणे दरवाजा येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मार्ग शिवभक्त पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्याचप्रमाणे रोपवे प्रशासनाने देखील आगामी 21 जुलै पर्यंत रोपवे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

    दरम्यान काल रायगडवाडी येथील (40 वर्षीय) मनोज खोपकर हा इसम टकमक टोक परिसरात असलेल्या धबधब्यावरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्याकरता एनडीआरएफचे पथक शोध मोहीम करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनामार्फत राज्यातील सर्व शिवभक्तांना 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर पर्यटनासाठी येऊ नये असे सुचित करण्यात आले आहे. दरम्यान मागील 24 तासांमध्ये महाड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ येथे गोडाऊनची भिंत कोसळली असून अंशतः नुकसान झाले आहे. महाड नवे नगर येथे पिठाची गिरणीचे अंशतः नुकसान झाले आहे. नातोंडी येथील घरांचे अंशतः नुकसान व बिरवाडी भैरवनाथ नगर येथील दोन कुटुंबातील पाच व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती महाड तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.