लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील एका भागातील तरुणीला तरुणाने फोनवरुन तुला मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु जर मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकून अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रेहान शेख रा. जुने जळगाव याच्याविरोधात शनिवार १५ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, १९ वर्षीय तरुणी जळगावातील एका भागात राहते. ६ जानेवारी रोजी सायंकाळी रेहान शेख याने तरुणीला मोबाईलवरुन संपर्क साधला. तसेच तु मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु जर मला भेटली नाही तर तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली. याप्रकाराने तरुणी घाबरली होती. अखेर कुटुंबियांना प्रकाराबाबत कळवून तरुणीने शनिवारी १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून रेहान शेख याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.


