जळगाव : प्रतिनिधी
पतीच्या विवाह बाह्य संबंधाला विरोध केल्याचा राग आल्याने पतीकडून पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नीच्या डोक्याला टाके पडले असून उजवा हात फॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना दि. ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अयोध्या नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोकलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अयोध्या नगरात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून याबाबत विवाहितेला माहीत झाले. विवाहितेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला असता, त्याचा राग आल्याने दि. ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित पतीने पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी रॉड विवाहितेच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच मारहाणीत विवाहितेचा हात देखील फॅक्चर झाला आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विवाहितेने दिलेल्या जबाबावरुन संशयित पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे