चोपडा : प्रतिनिधी
यावल रस्त्यावर हरियालीजवळ दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले. यात कुलदीप अशोक पगारे (वय २१) हा जागीच ठार झाला.
सविस्तर वृत्त असे कि, दि. ७ रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास यावल-चोपडा रस्त्यावर चोपडापासून ३ कि.मी. अंतरावर हरियालीजवळ चोपडाकडून माचला येथे जाणाऱ्या दुचाकीस्वारास मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. यात कुलदीप अशोक पगारे (२१, माचला, ता. चोपडा) या युवकाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरा सुखरूप बचावला. अपघात करणारा ट्रकचालक पसार झाला आहे.
या युवकास माचला येथील नितीन निकम, शिक्षक सतीश बोरसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.