लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुलाबी थंडीने धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपासुन सुर्यदर्शन झालेले नाही.
गुलाबी थंडीने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात आणि इतर ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी काही प्रमाणात धुके पडले आहे. पारा घसरल्याने तसेच सुर्यदर्शन नसल्याने गारठा कायम आहे. थंड हवा वाहत असल्याने थंडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेच्यावेळी आणि रात्री शेकोट्या पेटवुन थंडीपासून बचाव केला जात आहे.