Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कॅबिनमधून क्लिनर पडला अज्ञात वाहनाने चिरडले
    एरंडोल

    कॅबिनमधून क्लिनर पडला अज्ञात वाहनाने चिरडले

    editor deskBy editor deskJuly 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    झोपेची डुलकी लागल्याने ट्रकच्या कॅबिनमधून तोल गेल्याने क्लिनर गाडीतून पडल्यानंतर त्यास अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शहराजवळील दादाश्री पेट्रोलपंपानजीक शनिवारी सकाळी घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, धुळे जिल्ह्यातील लोणखेडी येथील समाधान फकिरा वाघ (वय ४५) या क्लिनरला डुलकी लागल्याने त्याचा तोल गेल्याने ते कॅबीनमधून खाली पडले. या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाने वाघ यास चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची ही दुर्घटना एरंडोलपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील दादाश्री पेट्रोल पंपानजीक शनिवारी सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली. चंद्रपूर येथून ट्रक (एमएच-१८, बीजी-८९९२) कोळसा भरून धुळे येथे जात होता. एरंडोलपासून थोड्या अंतरावर ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला क्लिनर समाधान वाघ याला झोपेची डुलकी लागल्याने त्याचा तोल गेला. यातच तो ट्रकमधून महामार्गावर खाली पडला. त्याचवेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या दुसरे वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. विकास देशमुख, राजेश पाटील, मुकेश अमोदकर, अनंत पाटील तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.