एरंडोल : प्रतिनिधी
किरकोळ वादातून युवकाच्या पोटावर व हातावर वार केल्याने तो जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. जखमी युवकाने औषधोपचार घेऊन जवळपास महिनाभरानंतर शनिवारी एरंडोल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सविस्तर वृत्त असे कि, परागसिंग किशोरसिंग परदेशी, रणवीर मंगेश जयस्वाल, राजवीर मंगेश जयस्वाल यांची एरंडोल येथील हॉटेल केसरीमध्ये पार्टी होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता त्यांच्या मित्रांनी त्यांच्यातील वाद मिटविला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये परागसिंग परदेशी हा चहा पिण्यासाठी गेला असता रणवीर जयस्वाल व राजवीर जयस्वाल हे तेथे गेले. रणवीर याने त्याच्या हातातील चाकूने परदेशीच्या पोटावर व हातावर वार केला. राजवीर याने लाकडी दांड्याच्या साहाय्याने मारहाण केली. त्यात परदेशी जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.