Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : झोपलेल्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न
    क्राईम

    संतापजनक : झोपलेल्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न

    editor deskBy editor deskJuly 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगांव : प्रतिनिधी

    पाचोरा तालुक्यातून बारा वर्षीय मुलीला रात्री झोपेत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जवळच तिची आई देखील झोपलेली होती, मुलीने त्याचवेळी आईच्या साडीचा पदर ओढल्याने आईला जाग आली. याप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यां सोबत झोपलेली होती. झोपेत असलेल्या बारा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
    संशयित आरोपी विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असताना मुलीने शेजारी झोपलेल्या आईच्या साडीचा पदर ओढला व आईला जाग आली.

    आईने आरडाओरड करताच संशयित आरोपीने तेथून पळ काढला. संशयिताचा मुलीच्या नातेवाइकांनी शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. घटनेची खबर पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच त्यांनीही तपासाचे चक्र गतिमान करत त्याचा शोध घेतला. आरोपीला ताब्यात घेत पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.