मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक मराठा समाजातील बांधवाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षापासून आक्रमक पवित्रा घेत असतांना नेहमीच दिसून येत आहे मात्र आजपासून पुन्हा रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. या रॅलीत काही जण अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ”हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे..5 टप्यात ही जनजागृती रॅली वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आरक्षणासाठी मराठा बांधवानी आतां बाहेर पडावे आणि यात शांततेच्या मार्गाने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी. आपला एक दिवस करोडो मराठा बांधवाच्या मुलाचं भविष्य उज्वल करणारा आहे”, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला कोणतेही गालबोट लागणार नाही. मात्र छगन भुजबळ यांना एकमेकांच्या पुढे आंदोलन उभा करून खुन्नसचीपणा दाखवण्याचा नाद असल्यामुळे ते कोणत्याही कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं आणि छगन भुजबळ हे सरकारमध्ये असल्यामुळे जर काही घडलं तर त्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री हे देखील जबाबदार असतील. समाजात शांतता सुव्यवस्था राहावी हे सरकारचं काम आहे मात्र ते काम आम्ही करत असल्याचे ते म्हणाले.