जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोरोना अहवालात आज दिवसभरातून ३७७ रूग्ण नवीन आढळून आले आहे. तर ४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ३७७ कोरोना रूग्ण नव्याने आढळले आहे. यात जळगाव शहर-१५५, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-१४४, अमळनेर-१३, चोपडा-१५, पाचोरा-१, भडगाव-७, धरणगाव-१, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार ८०५ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ८४६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.