धरणगाव : प्रतिनिधी
गुलाबरावजी पाटील साहेब फाउंडेशन यांच्या सहकार्याने धरणगाव शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम धरणगाव शहरात दिनांक : ५ जुलै २०२४ शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शहरातील बालकवी ठोंबरे विद्यालय इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय आदर्श विद्यालय परा विद्यालय या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे युवा नेते माजी जि.प.सदस्य श्री.प्रतापराव पाटील यांनी सांगितले की मंत्री महोदयांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदार संघात अनेक वर्षापासून मोफत वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना विठुरायांचे दर्शन घेण्याकरिता बसेस मधून त्यांना दर्शनासाठी घेऊन जाणे व घेऊन येणे असा उपक्रम राबवण्यात आला यावर्षी कीर्तनकार असतील वारकरी असतील दिव्यांग बांधव असतील.
अनाथ मुलं असतील या सर्वांना गरजेनुसार मोफत साहित्य वाटप करण्यात आले तसेच दरवर्षी धरणगाव तालुक्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला एक लाख रुपयाची स्कुटी देण्यात येते. तसेच धरणगाव येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय सलीम भाऊ पटेल आणि माजी शहर प्रमुख स्वर्गीय राजेंद्र भाऊ महाजन यांच्या स्मरणार्थ गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, उद्योगपती वाल्मीक पाटील यांच्यातर्फे शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना बूट देण्यात येतात या प्रसंगी कार्यक्रमात प्राध्यापक रमेश महाजन अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष हेमराज भाटिया इंदिरा कन्या विद्यालयाचे सचिव सी.के.पाटील मुख्याध्यापका सौ.सुरेखा पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन प.रा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.शिरसाट मॅडम डी.एस.पाटील सर शिवसेना परिवाराचे माजी.गटनेते पप्पू भावे शहर प्रमुख विलास महाजन बालकवी ठोंबरे शाळेचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर माध्यमिकचे मुख्याध्यापक एस एस पाटील सर शिरसाट सर ए एस पाटील डी एन पाटील एन बी पाटील भाजपाचे श्री शिरीष बयस माजी. नगरसेवक वासुदेव चौधरी भाजप शहर अध्यक्ष दिलीप भाऊ महाजन कन्हैया युवा सेना प्रमुख संतोष भाऊ महाजन रायपूरकर पापा वाघरे हेमराज चौधरी उद्योगपती वाल्मीक पाटील तौसीफ पटेल बाळासाहेब जाधव रवींद्र जाधव सोनू महाजन बुट्या पाटील सुरेश महाजन कमलेश बोरसे नंदकिशोर पाटील उपतालुकाप्रमुख संजय चौधरी सद्दाम हुसेन यांच्यासह शिवसेना शाखा धरणगाव सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिक उपस्थित होते.