जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सिद्धिविनायक नगरातील खासगी व्यवसाय करणाऱ्या एका ३० वर्षीय मुलाची ऑनलाइन टास्कच्या नावावर तब्बल ८ लाख ७६ हजार ३६३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना १ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमोल दिलीप बिरारी (वय ३०, रा. सिद्धिविनायकनगर, जळगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. अमोल हा खासगी व्यवसाय करतो, २२ जून ते १ जुलै यादरम्यान या युवकाची फसवणूक करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करून निमीशा रघुराम असे नाव सांगणाऱ्या महिलेने तिच्या टेलिग्राम खात्यावरून अमोलच्या टेलिग्राम खात्यावर संपर्क साधला तसेच पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दिले. तसेच रैंक अॅप ५२५३ या टेलिग्राम चॅनलकडून संपर्क साधून ८ लाख ७६ हजार ३६३ रुपये स्वीकारून, दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.