जळगाव : प्रतिनिधी
आजाराला कंटाळून रमेश काशिनाथ पाटील (वय ५८, रा. असोदा, ता. जळगाव) या शेतमजूराने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ४ जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास असोदा ते सुजदे रस्त्यावर घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गावात रमेश पाटील हे आपल्या पत्न ी व मुलासोबत वास्तव्याला होते. बकऱ्या चारणे व दुसऱ्यांची शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दुर्धर आजाराने त्रस्त होते. गुरूवार दि. ४ जुन रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते पत्न ीला बाहेर जात असल्याचे सांगून दुचाकी घेवून निघाले. आसोदा ते सुजदे रस्त्यावरील एका झाडाजवळ दुचाकी लावून त्यांनी बाजूच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. दरम्यान घरी परतले नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.
पहाटे ४ वाजता विहिरीजवळील झाडाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले असता रमेश पाटील यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. त्यांच्या पश्चात पत्नी सुशिला, मुलगा संतोष आणि दोन विवाहिता मुली असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.