Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयिताच्या दोन कार पेटवल्या
    क्राईम

    भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयिताच्या दोन कार पेटवल्या

    editor deskBy editor deskJuly 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतीनिशी

    येथील दुहेरी हत्याकांडातील संशयीत बंटी पथरोड वापरत असलेल्या दोन महागड्या कार अज्ञातांनी मध्यरात्री पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

    मिळालेली माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडात संशयित बंटी पथरोड याचे ही नाव असून तो सध्या पसार आहे. संशयित राहत असलेल्या जामनेर रोडवरील वाल्मीक नगर परिसरात झायलो व इको वाहन पार्क केलेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या वाहनांना ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. प्रभारी निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, या संदर्भात कुणाचीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    March 6, 2026

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.