जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात ४३ वर्षीय व्यक्तीने महिलेची छेड काढल्याच्या विषयावरून मारहाणीत त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना असोदा या गावात घडली आहे. हि घटना दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असल्याने असोदा गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर जळगाव तालुका पोलीस गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात भास्कर भंगाळे हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आसोदा गावातील गोकुळ नगर येथे तो गेला होता. त्यावेळेला मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी त्याला जाब विचारला. यानंतर काहींनी त्याला थेट मारहाण करायला सुरुवात केली.
या मारहाणीमध्ये भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या घटनेबाबत आसोदा गावामध्ये खळबळ उडाली असून तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.