धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद रोडवरील विहीर फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर धरणगाव पोलीसांनी पकडले. पुढील कारवाईसाठी पोलीसांनी महसूल विभागाला पत्र दिले आहे.
धरणगाव तालुक्यात बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांचे पथक सोनवद रोडवरील विहीर फाट्यावर १४ जानेवारी रोजी रात्री गस्तीला थांबले होते. दरम्यान विना नंबरचे एक ट्रक्टर बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना पोलीसांना आढळून आले. गस्तीवर असलेल्या पोलीसांनी ट्रक्टर चालकाला नाव व गाव विचारल्याने महेंद्र बाळू ठाकरे (वय 30 वर्ष, रा.खामखेडा ता.धरणगाव जि.जळगाव) असल्याचे सांगितले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांनी ट्रक्टर ताब्यात घेतले आहे. ट्रक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासदर्भात पोलीसांनी महसूल विभागाला पत्राद्वारे कळविले आहे.