जळगाव : प्रतिनिधी
क्रिकेट खेळत असतांना झालेल्या वादातून मुशरफ खान सईद खान (वय १७, रा. मास्टर कॉलनी) याला काका पुतण्याने बेदम मारहाण केली. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मास्टर कॉलनीत मुशरफ खान सईद खान (वय १७) हा मुलगा वास्तव्यास आहे. दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी त्याचा तौफीक खान याच्यासोबत वाद झाला. त्यामुळे तौफीकचे वडील तौसिफ खान व जावेद खान सर्व रा. मास्टर कॉलनी, जळगाव या तिघांनी मुशरफ खान सईद खान या मुलाला बेदम मारहाण करून जबड्यातील तीन दात तोडून दुखापत केली. त्यामुळे मुलाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी मुशरफ खान याने दिलेल्या फिर्यादीवरून तौसिफ खान आणि जावेद खान तिघे रा. मास्टर कॉलनी, जळगाव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.