नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी तब्बल चोवीस तासाहून अधिक काळापासून सुरूच आहे. यात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी 31 हजार 800 मते घेत विजयी कोटा पुर्ण केला असून त्यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याकरिता अजूनही 2 ते अडीच तासांचा कालावधी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, रात्री उशीरा बाद मतपत्रिका बाजूला काढल्यानंतर 31 हजार 576 चा विजयी कोटा अंतिम करण्यात आला. पण पहिल्या पसंतीक्रमात एकही उमेदवाराने हा कोटा गाठला नाही. परिणामी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. यावेळी सर्वात कमी मत घेतलेली एक- एक उमेदवार बाद करण्यात आला.