मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उद्या दि. २ जुलै पासून नारीशक्ती दूत नावाचा ॲप लाउनलोड करावा लागणार आहे.
आज सकाळी या संदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी तब्बल पाचशे अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली असून योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील महिलांना या योजनेला लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. एक पीडीएफ पाठविली जाणार असून त्या पीडीएफची पिंट घेवून अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज करतांना नाव, पत्ता, वय, आधारकार्ड नंबर, वडिलांचे नाव, पिनकोड नंबर, जन्म ठिकाण, मोबाईल नंबर देणे बंधणकारक असून यासाठी आधारकार्ड, रहिवास दाखल (डोमेसाईल), जन्म दाखल, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. गावपातळीवर अंगणवाडी मुख्यालय, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र, आशा वर्कर यांच्याकडे अर्ज जमा करावा लागणार आहे. यापूर्वी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना यासाठी अर्ज करता येणार नाही.