आता कानकोपऱ्यात मध्यरात्री “पोलीस दादा” पेट्रोलींग करणार
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव शहरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणगाव पोलीस प्रशासनाने स्वखर्चाने शहरात ठिकठिकाणी आर एफ आय डी बसविण्यात आले. पोलीस कर्मचारी रात्रीची पेट्रोलिंग करत आहे की नाही याबाबत थेट पोलीस अधिक्षकांना माहिती समजणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे.
धरणगाव शहरात अनेक दिवसांपासून बंद घर फोडण्याचे प्रकार समोर येत आहे. दाट वस्तीत कोणते घर बंद आहे हे बाहेरील व्यक्तीला कसे कळू शकते. काही ठिकाणी झालेल्या घटनास्थळी चारचाकी वाहने पोहचणे शक्य होत नाही त्यामुळे चोर हा अलर्ट राहतो. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून निष्कर्ष काढला की, शहरातील कानाकोपऱ्यात पोलीसांनी मोटारसायकलीद्वारे पेट्रोलिंग प्रभावीपणे राबविणे हे आव्हानात्मक आहे. मोटारसायकलीवर पेट्रोलींग करणारे पोलीस कर्मचारी हे गावागावातील कान्याकोपऱ्याच्या ठिकाणी पोहचतात की नाही याचा खात्री व नियमित करण्यासाठी पोलीस ठाण्यात नोंद वही ठेवण्यात आली होती. परंतू नोंदवही रोज चेक करणे शक्य नाही. जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू करण्यात आलेली आरएफआयडी या तांत्रीक पध्दतीने नियंत्रण ठेवणारी यंत्रणा ही धरणगाव शहरात राबविण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये आरएफआयडी अर्थात फास्ट ट्रॅक प्रणाली राबविण्याचा निर्णय धरणगाव पोलीस ठाण्याने घेतला आहे. यासाठी शहरातील लोकवर्गणी व पोलीस प्रशासनाच्या वतीने घरफोडी झालेल्या ठिकाणी आणि कानाकोपऱ्यात असे एकुण १३ फास्ट ट्रॅक लावण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करणारे पोलीस कर्मचारी हे कोणकोणत्या भागात जात आहे याची अद्ययावत माहिती थेट पोलीस अधिक्षकांना समजणार आहे. त्यामुळे धरणगाव शहर काही प्रमाणावर चोरीच्या घटनांवर आळा बसणार आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई
धरणगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले की, रात्री ११ ते पहाटे ६ वाजेच्या दरम्यान शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दुपारी शहरात फिरणारे फेरीवाले व हातगाडीवाले यांच्याकडे नजर ठेवून चौकशी करावी, संशयास्पद वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवावा. असे केल्यामुळे चोऱ्या होणार नाही. शिवाय कुणी नागरीक बाहेरगावी जात असतांना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नये आणि जातांना शेजारच्यांना सांगून जावे असे आवाहन केले आहे.
चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी शक्य असल्यास उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावे. पोलीसांनी मध्यरात्री पेट्रोलींग करण्यासाठी मदत करणाऱ्या पोलीस मित्रांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावे यासाठी धरणगाव पोलिसांच्या वतीने मदतनीस म्हणून गस्त राहण्यासंदर्भात परवानगी देण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.