यवतमाळ : वृत्तसंस्था
यवतमाळ जिल्ह्यात १ जुलै सोमवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील चापरडा गावाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेली माहितीनुसार, यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबवरुन आले होते. ते नांदेड येथील गुरुद्वारामध्ये चालले होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. इनोव्हा कारच्या बोनेटचा भाग जोरात धडक झाल्यामुळे ट्रकच्या मागच्या भागात शिरला. त्यामुळे बोनेटचा पत्रा उखडला गेला अन् पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. या गाडीत एअरबॅग्ज नव्हत्या. त्यामुळे चालकासह मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली. या जोरदार धडकेत इनोव्हा कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.