• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात भीषण अपघात : ७ ठार तर ५ गंभीर जखमी !

editor desk by editor desk
June 29, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
राज्यात भीषण अपघात : ७ ठार तर ५ गंभीर जखमी !

जालना : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना नियमित सुरु असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने दुसऱ्या एका कारला भरधाव वेगात धडक दिली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून 7 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृताची ओळख पटली नाही.

जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मोठी बातमी : अमरनाथ यात्रेला आजपासून झाली सुरूवात

Next Post

राजकारणाचे मनोज जरांगे हे केंद्रबिंदू ; मंत्री सत्तारांचे मोठे वक्तव्य !

Next Post
राजकारणाचे मनोज जरांगे हे केंद्रबिंदू ; मंत्री सत्तारांचे मोठे वक्तव्य !

राजकारणाचे मनोज जरांगे हे केंद्रबिंदू ; मंत्री सत्तारांचे मोठे वक्तव्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group