जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी कारवाई करत बुधवारी २६ जून रोजी रात्री ९ वाजता गेंदालाल मिल भागातील भिमा कोरेगाव चौकातून अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवारी २७ जून रोजी पहाटे ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय-२१), रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार असलेला गुन्हेगार महेश लिंगायत हा गेंदालाल मिल परिसरातील भिमा कोरेगाव चौकात येवून हातात कोयता घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने बुधवारी २६ जून रोजी रात्री ९ वाजता गेंदलाल मिल परिसरातून गुन्हेगार महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत याला अटक केली. त्याच्याजवळील लोखंडी कोयता पोलिसांनी जप्त केला आहे याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतनहरी गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार २७ जून रोजी पहाटे ३ वाजता महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील हे करीत आहे