धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील सोनवद-पिंप्री गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सोनवद-पिंप्री गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी देखील कोरोना चाचणीची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन गोपाल चौधरी यांनी केले आहे. दरम्यान माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. लवकरच मी कोरोणावर मात करेल व आपल्या सेवेकरिता हजर होईल. तरी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात असलेल्या हितचिंतक मित्र परिवार यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच लक्षणे आढळून आल्यास तातडीने करण्याची टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन गोपाल चौधरी यांनी केले आहे.