• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरी जातांना पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
June 28, 2024
in क्राईम, धुळे
0
घरी जातांना पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्देवी मृत्यू

धुळे : वृत्तसंस्था

साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (36) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दि.२७ रोजी अकरा वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन घरी जात असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेने पोलीस दलातून शोक व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाब गोविंदा शिंपी (36) हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्यास आहेत. ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने दररोज दुचाकीने आनंदखेडे ते साक्री अपडाऊन करायचे. काल रात्रीची ड्युटी असल्याने ते आज सकाळी कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते.मात्र, आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रक (जीजे 12/7447) ला मागाहून धडक दिली. या अपघातात पोकॉ. गुलाब शिंपी हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती आनंदखेडे गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर मित्रपरिवारासह आप्तस्वकीयांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात दुपारी उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. पोकॉ. गुलाब शिंपी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 5 वर्षांची मुलगी ,3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेने पोलीस दलासह आनंदखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

रोहित पवारांचा मोठा दावा : दादांचे २२ आमदार संपर्कात…

Next Post

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प

Next Post
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group