जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सरस्वतीनगर येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. २७ जून रोजी सकाळी ११:५५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शनिपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव ललित बऱ्हाटे (वय १७, रा. सरस्वतीनगर, भुसावळ रोड, जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ध्रुवचे वडील ललित बन्हाटे एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून तर आई ज्वेलर्सच्या दुकानात कामाला आहे. तो इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये मु.जे. महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गुरुवार दि. २७ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्रुवचे आई-वडील हे कामाला निघून गेले. तर त्याचा लहान भाऊ शाळेत गेला होता. घरात एकटाच असताना त्याने खोलीत स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
त्याचा लहान भाऊ शाळेतून घरी आला असता ध्रुव दरवाजा उघडत नाही, म्हणून त्याने शेजा-यांना सांगितले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता ध्रुव याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी तपासणीअंती मयत घोषित केले