एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील कढोली येथील आनंदा रमेश अहिरे (वय ३५) या तरुणाने गावाशेजारी असलेल्या खळ्यातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच जळगाव येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या तरुणाची परिस्थिती हलाखीची होती. हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करीत होता. त्याने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, तीन विवाहित बहिणी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते ग्रामपंचायत सदस्य भीमराव अहिरे यांचे थोरले बंधू होत.