• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

या राशीतील लोकांना आर्थिक चिंता होणार !

आजचे राशिभविष्य दि २६ जून २०२४

editor desk by editor desk
June 26, 2024
in राशीभविष्य
0
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

मेष :
तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमी विषयी कुठले ही मत मांडू नका. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल परंतु, सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की, जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा.

वृषभ :
संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. मात्र त्याच्या प्रयत्नांकडे पाहता, चमत्काराची अपेक्षा धरू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्याच्या उत्साहाला उत्तेजन नक्की मिळेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे.

मिथुन:
तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल – परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. अतिरिक्त ज्ञान व कौशल्ये शिकून घेण्यासाठई तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.

कर्क :
घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल परंतु, यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत.

सिंह :
तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु, त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल.

कन्या :
भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका, शांततेला मारक ठरू शकते. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात.

तूळ :
दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल.

वृश्चिक :
सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे.

धनु :

प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात परंतु, आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल.

मकर :
आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका जर, असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कुंभ :
आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल.

मीन :
आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात.

Previous Post

मुलीला घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला विहिरीत फेकले

Next Post

३५ वर्षीय तरुणाने संपविली जीवनयात्रा

Next Post
३५ वर्षीय तरुणाने संपविली जीवनयात्रा

३५ वर्षीय तरुणाने संपविली जीवनयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group