जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकामधील पोलीस ठाणे अंमलदार कक्षाचे नुतणिकरणाचे दिनांक २४ रोजी सायंकाळी उदघाटन पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, सदर ठाणे अंमलदार कक्षाचे नुतणिकरणामध्ये फर्निचर व कलरिंग, इलेक्ट्रीक या संबधीचे कामे करण्यात आले असुन पावसाळयाचे गच्चीवर पडणारे पाणी हे पि.व्ही.सी. पाईप द्वारे शोषखडयात सोडण्याचे (रेन वॉटर हार्वेस्टींग) देखील काम करण्यात आले आहे. तसेच वृक्षरोपण करण्यात आलेले आहे.
सदर उदघाटनाच्या वेळी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत सो., मा. पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड सो., दुय्यम अधिकारी व अंमलदार असे हजर होते. सदर नुतणिकरणासाठी जैन एरिगेशन सिस्टीम लिमीटेड चे चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स चे संचालक दिपक चौधरी, सुप्रीम इंड्रस्ट्रिज लिमीटेड चे जनरल मॅनेजर रविकिरण कोंबडे, धनंजय जहुरकर, हॉटेल प्रेसेडींटे चे संचालक मनोज अडवाणी, तुलसी एक्स्लुझनस लिमीटेड चे जनरल मॅनेजर संदीकादत्त मिश्रा, एच. आर. हेड पद्मनाभन अय्यंगर, व्यास इंड्रस्ट्रीज चे संचालक संजय व्यास, आदीत्य लॉन चे संचालक सुनिल मंत्री, हॉटेल फॉर सीजन चे संचालक महेश प्यारपियानी पुष्पा पल्सेस चे संचालक राजेश अग्रवाल, किरण मशीन टुल प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक चेतन चौधरी अग्रवाल स्टीलचे संचालक मनिष अग्रवाल, माजी नगरसेवक मनोज अहुजा यांचे सहकार्य लाभले असुन सदरच्या नुतणिकरणाचे काम आर्किटेक मनोज पिट्रोदा यांचे मार्गदशनाखाली करण्यात आले आहे. तसेच सदर ठिकाणी काम करणारे कामगारांचा देखील सत्कार करण्यात आला आहे.