जळगाव : प्रतिनिधी
जळगावच्या सराफा बाजाराची नोंद सुवर्ण नगरी म्हणून होत असते. याच सुवर्ण नगरीत सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी प्रत्येकी 1 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे प्रती तोळा भाव शुक्रवारी 72 हजार 100 रुपये तर चांदीचे प्रती किलोचे भाव 91 हजारांवरून 90 हजार रुपयांवर खाली आले. सोने-चांदीचे दर दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचतील असा अंदाज असताना शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात प्रत्येकी एक हजार रुपयांनी घसरण झाली. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सटोडियांची नफेखोरी कारणीभूत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करून परिणाम घडवणारे नफेखोरांमुळे सोने चांदीच्या दराच्या चढउतार होत असल्याचं सराफ व्यावसायिक यांच म्हणणं आहे.
सोने-चांदीचे दर दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचतील असा अंदाज जाणकारांनी वर्तवला होता. मात्र असे असतानाच शुक्रवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात प्रत्येकी एक हजार रुपयांनी घसरण झाली. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सटोडियांची नफेखोरी कारणीभूत आहे. दरम्यान दिवाळीपर्यंत सोने व चांदीच्या दरात अशीच चढउतार होत राहील, असे सोने-चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी खबरदारी घेऊन गरज असेल तेव्हाच खरेदी करावी, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. सोन्याचे गुरूवारी प्रती तोळा ७३१०० रुपये असलेले दर शुक्रवारी 72100 तर चांदीचे प्रति किलोचे दर 91 हजारांवरून 90 हजारांवर खाली आले होते. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करून परिणाम घडवणारे नफेखोर आहे असे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.