धरणगाव : प्रतिनिधी
भरधाव दुचाकीने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष अनिल कांबळे (४, धरणगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती अनिल कांबळे ही सासू कमळबाई कांबळे व व मुलगी हर्ष हिच्यासह धरणगावातील दादाजी नगर परिसरात वास्तव्यास होते. मजुरी काम करून कांबळे हे परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी दुपारी २ वाजता वाजता अमळनेर रस्त्यावर पांढरी विहीर परिसराजवळ अनिल कांबळे यांची पत्नी ज्योती या हर्पूसोबत पायी चालत जात होत्या. त्याचवेळी नितीन रमेश पाटील (सानेनगर, अमळनेर) हा दुचाकी (एमएच१९/सीसी ७८१०) वरून भरधाव वेगाने अमळनेरच्या दिशेने जात होता. दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याने थेट हर्मूला समोरून जोरदार धडक दिली. त्यात ती जबर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना हर्षांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात नितीन पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सय्यद करीम सैय्यद अमजद हे करीत आहेत.