Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित दादांच्या आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले
    क्राईम

    अजित दादांच्या आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

    editor deskBy editor deskJune 23, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    पुणे शहरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आमदार पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

    स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे. अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्यानं मद्य प्राशन केलेले का? याचाही तपास सुरू आहे.

    आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुण्यातील पोर्शे अपघातानंतर पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच, पुणे पोर्शे अपघातानंतर झालेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात आणखी एका आमदाराचं कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. पुणे पोर्शे अपघातात आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं होतं. तसेच, रविवारी झालेल्या पुणे-नाशिक अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटलांचं नाव समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.