Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जरांगे पाटलांची भुजबळ यांच्यावर सडकून टीका ; तर नाव बदलेन…
    राजकारण

    जरांगे पाटलांची भुजबळ यांच्यावर सडकून टीका ; तर नाव बदलेन…

    editor deskBy editor deskJune 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    राज्यात मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन्ही गटाकडून उपोषण सुरु आहे तर नुकतेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत.

    जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ यांनीच मराठा धनगर यांच्यातील वाद पेटवला. त्यांना आता सुट्टी नाही. त्यांचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलेन असे म्हटले आहे. ”छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला. आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहे. दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे. आम्ही हे कधीच खपवून घेणार नाही, आता छगन भुजबळ यांना सुट्टी नाही”, असा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

    पुढे बोलतांना जरांगे म्हणालेत, ”ओबीसींच्या इतर नेत्यांनी तरी असा जातीयवाद करू नये. भुजबळांना धनगर आणि गरीब मराठ्यात वाद निर्माण करायचा आहे. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला साडेचारशे जाती महत्त्वाच्या की महाराष्ट्र महत्त्वाचा आहे? हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का? भुजबळांनी दोन पालकमंत्री जवळ ठेवले आहेत. आम्हाला काही फरक पडत नाही. वेळेला आम्ही दाखवून देऊ. छगन भुजबळ विनाकारण मराठ्याच्या विरोधात जात आहे”, असे अनेक आरोप जरांगे यांनी भुजबळांवर केले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.