लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयात गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कोवीड लस देण्यात आले.
कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने १५ वर्ष वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने शिरसोली रोडवरील जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय व शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद राहिल्याने विध्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणत होतांना दिसत आहे. यावर उपाय म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले पाहिजे, या उद्देशाने संचालक प्रितम यसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या प्रयत्नातून रायसोनी महाविद्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १८७ विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
शिबीर यशस्वीतेसाठी शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. तेजस्विनी देशमुख व डॉ. करुणा भालेराव, प्रा. संदीप पाटील, प्रा. राज कांकरिया, प्रा. शितल किंग, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. भाग्यश्री बारी, प्रा. श्रुती अहिरराव, प्रा. गायत्री भोईटे, प्रा. प्रियांका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. अनिल सोनार, संतोष मिसाळ आदी उपस्थित होते.