जळगाव : प्रतिनिधी
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार, दि. २२ जून रोजी सायंकाळी जळगाव शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत खान्देशातील शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत.
दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री नाशिककडे विमानाने रवाना होतील. नाशिकमधील संस्था चालकांसोबत बैठक आटोपून ते दुपारी ४ वाजता अहमदनगर येथे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून ते सायंकाळी ५:५० वाजता एमआयडीसीतील आदित्य लॉन्स येथे येतील. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्था चालकांसोबतची बैठक आटोपून ते पावणे आठ वाजता विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.