Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर पोलिस ठाण्यावरील हल्लाप्रकरणी १५ अटकेत
    क्राईम

    जामनेर पोलिस ठाण्यावरील हल्लाप्रकरणी १५ अटकेत

    editor deskBy editor deskJune 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करत पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या १५ संशयितांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी ३०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रुटमार्चही काढला. छर्रे असलेल्या बंदुकीतून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यातील संशयित सुभाष उमाजी भिल ३५) याला गुरुवारी भुसावळात अटक करण्यात आली. या आरोपीला ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी जमाव आधीच जामनेर येथील पोलिस ठाण्याबाहेर थांबून होता. मात्र, आरोपी जळगावला असल्याचे कळताच जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक केली.

    त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदेसह दहा पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी पोलिस ठाण्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी संशयितांना दुपारी बंदोबस्तात न्यायालयात आणले. या संशयितांना न्या. डी. एन. चामले यांनी २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.