जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलगी घरात असतांना यशवंत अनिल अहिरे (वय २०, रा. आमलेश्वर नगर, अमळनेर, – ह. मु. मेस्कोमाता नगर) हा तरुण अल्पवयीन मुलीच्या घरात शिरला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला तु मेरी जिंदगी है असे म्हणत तिच्याकडे वाईट नजरेने बघून – तिचा विनयभंग केला. ही घटना दि. १९ जून रोजी – रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १७ जून रोजी ही मुलगी घरात एकटी असतांना मेस्को माता नगरातील यशवंत अनिल अहिरे हा तरुण त्या मुलीच्या घरात शिरला. यावेळी त्याने मुलीला बघून तू मेरी जिंदगी है असे म्हणत तिच्याकडे वाईट नरजेने बघितले. तसेच वाईट हेतूने त्या मुलीसोबत जवळीक साधण्याचा देखील त्याने प्रयत्न केला. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलीने कुटुंबियांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित यशवंत अनिल अहिरे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सजय मराठे हे करीत आहे.