• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तीनशे रुपयाचा वाद अन थेट तरुणावर शस्त्राने वार

editor desk by editor desk
June 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळ ३०० रुपये न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संजय अकोलकर (वय २०, रा. मारुती मंदिरजवळ, शिवाजीनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी सकाळी १०:३० वाजता अक्षय अकोलकर हा रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळील नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी आला होता.

त्यावेळी त्याच्या ओळखीचा गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर (रा. शिवाजीनगर) हा तिथे आला. त्याने अक्षयकडे ३०० रुपये मागितले. नाहीतर ‘तुझ्या अंगावरील कोट दे’ असे सांगून अक्षयच्या अंगावरील कोट हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गजाननने धारदार शस्त्र काढून अक्षयवर वार केले. त्यामुळे त्याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. यात जखमी झालेल्या अक्षयला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल किशोर निकुंभ करत आहेत.

Previous Post

आरोपीच्या ताब्यासाठी जमावाने केला पोलिस ठाण्यावर हल्ला

Next Post

चहार्डी रस्त्यावर बस उलटली ; दोन प्रवासी, चालक-वाहक जखमी

Next Post
चहार्डी रस्त्यावर बस उलटली ; दोन प्रवासी, चालक-वाहक जखमी

चहार्डी रस्त्यावर बस उलटली ; दोन प्रवासी, चालक-वाहक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group