Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धुळेकडे जात असतांना जळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू
    क्राईम

    धुळेकडे जात असतांना जळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

    editor deskBy editor deskJune 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात जळगाव येथील तरुण ठार झाला. जळगाव येथून धुळ्याकडे येत असताना फागणे गावाजवळ बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील अन्य दोन तरुण गंभीर जखमी आहेत. मयत तरुणाचे जुनेर शेख (वय २५, रा. जळगाव) असे नाव आहे. जळगावमधील तांबापुरा भागात राहणारे जुनेर शेख, अरबाज खाटीक, सलमान खाटीक हे २० ते २५ वयोगटातील तरुण दुचाकीने जळगावहून धुळ्याकडे ट्रिपल सीट येत होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळे दुभाजकावर जाऊन धडकली. यात जुनेर शेख याचा मृत्यू झाला. तर अरबाज आणि सलमान हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच फागणे गावासह धुळ्यातील बऱ्याच जणांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने तिघा जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच डोक्याला मार लागल्यामुळे जुनेर शेख याचा मृत्यू झाला. धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्रीचा वाद ठरला जीवघेणा; भुसावळात ४२ वर्षीय तरुणाचा खून !

    February 28, 2026

    भल्या पहाटे पोलिसांची कारवाई : बांभोरीत ४० वाहनांवर धाडसी कारवाई !

    February 28, 2026

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.