जालना : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु होते. आता त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहे. या दरम्यान जालना जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या आंदोलनाची धग देखील वाढत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला चढवला आहे. लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सराकर पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आापण आंदोलन सोडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले. एकाही तरूणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी टीका केली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आपला विरोध नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे. या आधीचे आंदोलन आणि आताचे आंदोलन पाहिले की हे लक्ष्यात येते. आंदोलनाला एवढी गर्दी कशी होतेय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सरकार मुद्दाम हे घडवून आणत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे.