जळगाव : प्रतिनिधी
कर्जाला कंटाळून किसन मोरसिंग राठोड (४६, रा. खेडगाव, ता. एरंडोल) या शेतकऱ्याने राहत्या घरात विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. ही घटना १५ जून रोजी घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्री २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, किसन राठोड यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्ज वाढतच असल्याने कर्जाला कंटाळून त्यांनी १५ जून रोजी दुपारी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. नातेवाइकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवार, १७ जून रोजी मध्यरात्री २ वाजता मृत्यू झाला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मत्यची नोंद करण्यात आली आहे