चोपडा : प्रतिनिधी
काल दि. १८/०६ /२०२४ रोजी अनेकांना विष बाधा झाल्याची उघडकीस आली. सोमवार रोजी १७/०६ /२०२४ रोजी कमळगाव येथे आठवले बाजार भरत असतो. त्या अनुशंगाने आसपासचे गावातील अनेक लोक हे बाजार निमित्ताने तेथे बाजारासाठी येत असतात. तेथे पाणीपुरीवाला हा कमळगाव येथे पाणीपुरी हातगाडीवर पाणीपुरी विकतो.
दरम्यान तेथे आसपासच्या गाव चांदसनी, पिंप्री, मितावली, येथील अनेक लहान मुले, तरुण, वृद्ध अनेक्कानी पाणीपुरी खाली. ती खाल्याने सोमवार रोजी रात्री पर्यंत कोणालाही काहीच त्रास जाणवला नाही. सकाळी मंगळवार १० ते ११ सकाळच्या सुमारापासून अनेकांना त्याची लक्षणे जाणवू लागली. तसेच काहींना ताप, उलटी, मळमळ चक्कर येणे अशा प्रकारची जाणवत होती.
दरम्यान खाजगी दवाखाना प्रथम उपचार घेतला असता पेशंट संख्या वाढू लागली. त्यामुळे लोकांनी अडावद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मोठ्या प्रमाणात पेशंटची व गावातील स्थानिक सहकार्य करणारे प्रशासकीय, लोकप्रतिनिधी, तरुण, गावातील काजगी क्लिनिक सेंटरचे डॉक्टर यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
परिस्थिती फार भयावह होती. परंतु अनेकांच्या सहकार्याने विषबाधा झालेल्या पेशंट यांच्यात सुधारणा होत असतांना दिसत आहे, असे डॉ. यांचे म्हणणे आहे. त्यात अडावद प्राथमिक केंद्राचे डॉक्टर अर्चना पाटील, तेथील इतर सहकारी, गावातील राकेश पाटील, सचिन महाजन, अडावद ग्रामपंचायत कर्मचारी, ज्यागावात विषबाधा झाली तेथील सरपंच गावतील ग्रामपंचायत कर्मचारी अनेक तरुण यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. तेथे बातमी कळताच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य विभागातील कर्मचारी यांचीही उपस्थितीने लाभली