Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव शहराला तीनशे कोटींची निधी द्या !
    जळगाव

    जळगाव शहराला तीनशे कोटींची निधी द्या !

    editor deskBy editor deskJune 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील अनेक कॉलनी परिसरात उत्तम प्रकारचे रस्ते, गटारी झाल्या आहे. पण अनेक परिसरात आज देखील रस्ते व गटारी होवू शकलेले नाही त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनपात नेहमीच तक्रारी येत असतात, याचीच दखल घेत मनपाचे माजी महापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे शहरातील आणखी २०० ते ३०० कोटीचा निधी मिळावा यासाठी साकडे घातले आहे.

    निवेदनात म्हटले आहे कि, जळगांव शहरासाठी भरघोस निधी यापूर्वी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रत्यनातून मिळाला आहे. यासाठी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी २५ कोटींचा निधी मिळवून दिला. त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मिळवून दिला. त्यातुन ४२ कोटींचे काम चालु आहे. त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातुन काँक्रीट रस्त्यांसाठी १०० कोटी प्राप्त झाले व त्यातुन रस्त्यांची कामे चालु आहे. परंतु शहरातील भरपुर कॉलनी परिसरातील रस्त्यांची कामे अजुनही बाकी आहेत व काही परिसरांमध्ये रस्ते सुध्दा झालेले नाहीत. म्हणून आपणास विनंती की, शहरातील रस्त्यांसाठी अजुन २०० ते ३०० कोटीचा निधी मंजुर करुन द्यावा व गटारींची स्थिती खराब असल्याने गटारींसाठी सुध्दा १०० कोटींचा निधी मंजुर करुन द्यावी ही नम्र विनंती.

    यावेळी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, भाजपा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा प्रमुख राधेश्याम चौधरी, माजी उपमहापौर सुनील खडके, भाजपा सरचिटणीस अमित भाटिया, सौरभ लुंकड, डॉ.क्षितिज भालेराव यांची उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.