Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री भुजबळ अडचणीत ? न्यायालय बजाविणार वॉरंट
    राजकारण

    मंत्री भुजबळ अडचणीत ? न्यायालय बजाविणार वॉरंट

    editor deskBy editor deskJune 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक भूमिकेने सध्या चर्चेत आहे. त्यातच मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा इशारा सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आले आहे.

    कलिनामधील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदी असताना हा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी मंत्री भुजबळ यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

    न्यायालयाने इशारा देताना म्हटले आहे की, तुम्ही अनेकदा तारखांना गैरहजर राहिला आहात. पुढील सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावले जाईल, असा तोंडी इशारा देत भुजबळ यांचा सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज फेटाळला. तसेच पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. याप्रकरणी आता 28 जून रोजी सुनावणी होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.