पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या सार्वे गावानजीक ६० वर्षीय वृद्धाचा रस्त्याच्या कडेला उभा असताना भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचालक ही जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, सार्वे गावाजवळ सुखदेव गोबा ठेलारी (६०, सार्वे, ता. पारोळा) हे रस्त्याच्या कडेला उभे असताना जळगावकडून धुळ्याच्या दिशेने नीलेश अशोकराव पाटील (नागपूर) हे दुचाकीने (एमएच ३१टी००४५) भरधाव वेगात जात होते. त्यावेळी उभ्या असलेल्या सुखदेव ठेलारी यांना त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. अपघातात पाटील हेही जखमी झाले. याबाबत पारोळा पोलिसात रविकांत सुकदेव ठेलारी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.