मेष :
तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात.
वृषभ :
जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. परंतु, आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल.
मिथुन :
दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. रोमान्ससाठी चांगला दिवस. दीर्घकालीन फायदा देणाऱ्या प्रकल्पांवर काम करा. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे.
कर्क :
आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड आनंदी राखतील. व्यावसायिक उद्दीष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळविण्यास अत्यंत योग्य काळ आहे.
सिंह :
स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. प्रणयराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल.
कन्या :
तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल.
तूळ :
मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकते. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल.
वृश्चिक :
तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील त्यांचा उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही – परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत – तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल – तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा.
धनु :
तुमच्यावर प्रेम करणाºया आणि तुमची काळजी वाटणाºया लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात.
मकर :
तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात.
कुंभ :
तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून, तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु, बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता ही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते.
मीन :
आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ शकतात. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ देणे ही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात.