जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भडगाव व अमळनेर येथील तीन विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत झाल्यानंतर दि.१४ रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. त्या ठिकाणी चार जून रोजी सायंकाळी रशियामध्ये वालखोव नदीत बुडून अमळनेर येथील जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी (दाेघे अमळनेर) आणि हर्षल अनंतराव देसले (भडगाव) या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. घटनेनंतर चार दिवसानंतर त्यांचे मृतदेह सापडले होते. त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तिघा विद्यार्थ्यांचे मृतदेह रशियातून त्या विद्यार्थ्यांचे मृतदेह मास्को वरून दुबई मार्गे मुंबईला गुरुवार (दि.१३) रोजी भारतात पोहचले.
मुंबईत पोहचल्याववर पालक तसेच जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येऊन शुक्रवार (दि.१४) रोजी सकाळी जळगाव जिल्ह्यात पोहोचले. भडगाव येथे हर्षल देसले या विद्यार्थ्यावर हिंदू धर्माप्रमाणे तर अमळनेर शहरात जिया पिंजारी व जीशान पिंजारी या दोघा बहिण भावावर मुस्लिम पध्दतीने शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव नागरिकांनी अंतिक यात्रेत शोकाकूल होत सहभाग नोंदवत हळहळ व्यक्त केली.
रशियातील व्होल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या तामिळनाडूतील चार विद्यार्थ्यांचा देखील व्होल्गा नदीत बुडून मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे त्यांचे मृतदेह घरी आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यापैकी तीन विद्यार्थी २२ वर्षांचे होते आणि एमडी पदवीचे शिक्षण घेत होते. तर चौथा, स्टीफन लेबाकू हा २० वर्षांचा होता. चेन्नईतील पेरांबूरचा रहिवासी, तो पदवीपूर्व वैद्यकीय कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता.