प्रतिनिधी लक्ष्मण पाटील
: धरणगाव येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालया तर्फे मासाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रतिमापूजन मा.नगराध्यक्ष सौ उषाताई वाघ व (अँड) वसंतराव भोलाने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,उपनगराध्यक्षा कल्पना ताई महाजन,माजी नगराध्यक्षा सौ अंजलीताई विसावे,राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे,नगरसेवक सुरेश महाजन, नंदू पाटील,(अँड)संदिप पाटील, विनोद पाटील सर,प्रकाश पाटील, बाळासाहेब जाधव,राजेंद्र ठाकरे, दीपक महाजन,दिलीप बापू पाटील,नगराज पाटील,छोटू जाधव,व्ही टी माळी सर,वाल्मिक पाटील,विलास महाजन,प्रशांत येवले,राहुल रोकडे,सतीश बोरसे,योगेश पी पाटील,प्रथमेश सूर्यवंशी,भास्कर चव्हाण,मोतीलाल माळी,रघुनंदन वाघ,दीपक गायकवाड,संजय चौधरी
आदी उपस्थित होते.